भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

बारावीच्या निकालाची वेळ अगदी जवळच, १५ लाख विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत, कुठे पाहता येणार निकाल

पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या निकाला बाबत विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.
राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागून राहिलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result) उद्या दिनांक २१ मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) याबाबत माहिती देण्यात आली आहे. बोर्डाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती.

बारावीचा निकाल पाहण्यासाठी बोर्डाकडून वेबसाईट जाहीर करण्यात आलेल्या आहेत. बारावीचे विद्यार्थी (HSC Students) maharesult. nic. in या वेबसाइटवर निकाल पाहू शकतात. तर, राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांना www.mahasscboard.in या वेबसाईटवर एकत्रित निकाल पाहयाला मिळेल. याशिवाय बोर्डाकडून आणखी वेबसाईट जाहीर करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं प्रमुख दोन वेबसाईटशिवाय आणखी काही वेबसाईट जाहीर केल्या आहेत. मंडळाच्या वेबसाईटसह इतर वेबसाईटवर निकाल पाहणं विद्यार्थ्यांना सोपं जाणार आहे. मंडळाकडून इतर वेबसाईट जाहीर करण्यात आल्यानं वेबसाईटच्या सर्व्हरवर येणारा ताण कमी होऊ शकतो.

मंडळाच्या वेबसाईट
१. mahresult.nic.in
२. www.mahahsscboard.in

मंडळाच्या वेबसाईट व्यतिरिक्त कुठं पाहाता येणार निकाल?
३. http://hscresult.mkcl.org
४. https://results.digilocker.gov.in
५. http://results.targetpublications.org

बारावीचे १५ लाख विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत
कधी पासून च विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहात होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. राज्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांच्या वतीनं नोंदणी करण्यात आलेली होती. बारावीचे विद्यार्थी आणि पालकांची निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, बारावीचा निकाल उद्या उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची छापील प्रत संबंधित महाविद्यालयांमध्ये काही दिवसानंतर उपलब्ध होईल. त्यानंतर विद्यार्थी पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी त्याचा वापर करु शकतात. सीबीएसईनं यापूर्वीच दहावी आणि बारावीचा निकाल एकाच दिवशी जाहीर केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!