भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

सावदा – कोचूर रोड वरील मंगल कार्यालया शेजारून जाणारा शिव रस्ता तयार करून मिळावा – शेतकऱ्यांची मागणी

सावदा,ता.रावेर.मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील सावदा येथिल कोचूर रोड वरिल कुलसूम बाई मंगल कार्यालय शेजारून जाणारा रस्ता हा गट नंबर 709 , 710 , ते 897 , 98 हा शिव रस्ता तयार करून मिळावा यासाठी सदरील समस्त शेतकरी वर्गाने 2021 साला पासून सतत विनंती अर्ज देऊन मुकताईनगर विधानसभेच्या लोकप्रतिनिधी यांना विनवणी केली मात्र अद्याप पर्यंत सदरील रस्ता हा तयार न झाल्याने या मार्गावरून ये- जा करणाऱ्या शेतकरी तथा शेतमजूर वर्गाला अत्यंत जिकरीचे आणि त्रासदायक झाले आहे..तर बैलगाडी..ट्रॅक्टर जाणे अशक्यच होत असल्याने शेत पिकांचे खूप नुकसान होत आहे.

या रस्त्यावर पाणी साचून चिखल होत आहे तर पायदळ चालणे सुध्दा सोपे नाही अशा परिस्थितीत शेतीची कामे कशी करावी हा बिकट प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे तरी सदरील लोकप्रतिनिधीं नी लक्ष घालून आमची समस्या सोडवावी अशा स्वरूपाचे निवेदन संबधित शेतकरी वर्गाने मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

या निवेदनावर राज किरण चिमण बेंडाळे, रविंद्र जावळे, देवेंद्र पुरुषोत्तम धांडे, दीपक बेंडाळे, एकनाथ दुला नेमाडे, अतुल रामदास नेमाडे,रविंद्र बळीराम नेमाडे, मनीष भंगाळे, सुरेश वामन नेमाडे, आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!