अमळनेरक्राईमजळगाव

फिर्यादीस डांबून ठेवले प्रकरणी सह.पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक व अन्य दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l शिवीगाळ करून वाद घातल्या प्रकरणी सेवा निवृत्त सैनिक व इतर सहा जण पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्या साठी गेले असता त्यांची तक्रार न घेता उलट त्यांना पोलिस स्टेशनला डांबून ठेवण्यात आले. आणि त्यांच्या कडून एक लाख रुपयांची मागणी केली. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार एक सहाय्यक पोलीस निरीक्षक,उपनिरीक्षक व दोन हवालदार यांचे विरुद्ध पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील एकलहरे येथील रहिवाशी असलेल्या माजी सैनिक फत्तेलाल अर्जुन पाटील यांना गावातीलच एकाने दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी अश्लील शिवीगाळ करून मोठा वाद घातला. या प्रकरणी मारवड पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी फत्तेलाल पाटील व अन्य सहा जण गेले असता त्यांची फिर्याद तर घेतलीच नाही उलट त्यांना सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, उपनिरीक्षक किशोर पाटील, पोहेका भरत ईशी व पोहेका रेखा ईशी यांनी पोलिस स्टेशनच्याच एका खोलीत डांबून ठेवले.

ते इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पाटील ज्यांच्या विरुद्ध फिर्याद देण्या साठी आले होते त्यांनाच पोलिस स्टेशनला बोलावून त्यांना फत्तेलाल पाटील व अन्य सहा व्यक्ती विरोधात फिर्याद देण्यास लाऊन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. आणि पाटील यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. मात्र यांनी एक लाख रुपये न दिल्याने पोलिसांनी फत्तेलाल पाटील सह अन्य सहा जणांना अटक केली होती.

शेवटी फत्तेलाल पाटील यांना जामीन मिळाल्या नंतर पोलिस अधीक्षक,पोलिस महानिरीक्षक यांचे कडे तक्रार दाखल केली होती.परंतु या तक्रारी वर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. म्हणून फत्तेलाल अर्जुन पाटील यांनी अमळनेर न्यायालयात दाद मागितली होती. अमळनेर न्यायालयाने सदर प्रकरणाची परिस्थिती तपासून तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, उपनिरीक्षक किशोर पाटील, पोहेका भरत ईशी व पोहेका रेखा ईशी यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.त्या नुसार त्यांचे विरोधात ३४१,३८४,३८५,३२३,४६४,५०४,५०६,१२०(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!