भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेरसामाजिक

चिनावल मधील संचारबंदी उठविली, पण…संध्याकाळी बाहेर पडण्यावर निर्बंध..

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गेल्या तीन दिवसांपासून म्हणजेच दी. १७ मे पासून २० मे च्या मध्यरात्री १२ वाजे पर्यंत रावेर तालुक्यातील चिनावल येथे संचारबंदी लागू करण्यात आली होती. पण आता संचारबंदी सोमवारी दीं . २० मे रिजीच्या मध्यरात्रीपासून उठविण्यात आली आहे .परंतु असे असले तरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून व गावात सर्वत्र शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून संध्याकाळी सात वाजेनंतर कोणीही घरा बाहेर निघू नये, लोकांना घरा बाहेर पडण्यावर निर्बंध लादण्यात आलेले आहेत.

दि.१७ मे शुक्रवार च्या संध्याकाळी चिनावल गावात समाजकंटकांकडून झालेल्या तुफान दगडफेकी नंतर गावात २० मे सोमवार च्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदी लवण्यात आली होती.गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा गेली तीन दिवस कायम होता. संपूर्ण बंद असल्याने गावातील लोकांच्या दैनंदिन गरजा, शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबली. सर्व व्यवहार बंद असल्याने लोकांचे खूपच हाल झाले. मुठभर समाजकंटकां मुळे प्रशासनासह संपूर्ण गावाला वेठीस धरण्यात आल.

सोमवारी संचारबंदीचा तिसरा आणि शेवटचा दिवस होता. त्या निमित्त गावातील संचारबंदी उठण्याच्या आधी प्रशासनाने ग्रामस्थांची बैठक बोलावण्यात आली. त्या बैठकीत ग्रामस्थांनी एकोप्याने अंतर्गत वाद मिटवावेत, अन्यथा अजून कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे. सोमवार दि. २० मे च्या मध्यरात्रीपासून चिनावल मधील संचारबंदी उठविण्यात आली असून आज दि. २१ मे मंगळवार सकाळ पासून गावातील दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले असून तरी देखील कुठलाही अनर्थ घडू नये या साठी गावात पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आलेला आहे.

तसेच गावात शांतता राखण्यासाठी काय काय उपाय योजना करता येतील या विषयी चर्चा करण्यात आली. या वेळी चिनावल ग्रामस्थांनी आपल्या भावना मांडल्या गुन्हेगाराला शासन व्हायलाच पाहिजे, अप्पर पोलीस अधीक्षक
नखाते यांनी सदर घटनेतील आरोपी शोधून कायदेशीर कारवाई तर करणारच आहे मात्र या पुढे असे घडता कामा नये कोणी जर आपल्याला भडकवत असेल तर अशा लोकांवर विश्वास ठेवू नका अशा सूचना दिल्या.
वेळी अप्पर पोलीस अधीक्षक नखाते, रावेर तहसीलदार बंडू कापसे , मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राज कुमार शिंदे, सावदा पो स्टे चे सपोनी जालिंदर पळे यांचे सह गावातील प्रमुख पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सोबत महसूल विभागिचे तहसीलदार बंडू कापसे,अप्पर तहसीलदार मयूर कळसे, नायब तहसीलदार संजय तायडे मडळाधिकारी अनंत खवले, तलाठी लिना राणे यांनी सहकार्य केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!