तब्बल ११९ शाळांच्या मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळांकडून कर्मचाऱ्यांची माहिती प्रशासनाला देण्यात आली नसल्याने माहिती सादर न केल्याने तब्बल ११९ शाळांच्या मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येण्याची माहिती पुढे आली आहे .ही घटना छत्रपती संभाजीनगर ची असून छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या कडून हा कारवाई करण्यात येत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेली माहिती अशी की, निवडणुक कामासाठी जिल्ह्यातील ११९ शाळां कडून शिक्षकांच्या याद्या आणि त्यांची इतर माहिती जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये, शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांची माहिती छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने मागवण्यात आली होती. ज्यात जिल्ह्यातील ११९ शाळांनी आपल्या शिक्षकांच्या याद्या आणि त्यांची माहिती सादर केली नाही. त्यामुळे आता या शाळांच्या मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. या कारवाई ने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून मात्र ही कारवाई केव्हा होईल या बाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.