दुय्यम निबंधक कार्यालये २९ ते ३१ मार्च सार्वजनिक सुटृीच्या दिवशी सुरु राहणार
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | वार्षिक बाजारमूल्य दर तक्ते दरवर्षी १ एप्रिल रोजी प्रसिध्द होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात, मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी होत असते. तसेच महत्वाच्या सणामुळे देखील दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे. हे लक्षात घेवून आणि आर्थिक वर्ष २०२४-२०२५ या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने दि. २९ ते ३१ मार्च, २०२५ या आर्थिक वर्षअखेर असलेल्या सुट्टीच्या दिवसात सर्व नोंदणी कार्यालये सुरु ठेवण्यात येत आहेत.
या बाबतच्या सूचना आपले अधिनस्त असलेल्या सर्व दुय्यम निबंधक यांना आपले स्तरावरुन देण्यात याव्यात असे नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) उदयराज चव्हाण महाराष्ट्र राज्य पुणे, यानी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
वार्षिक बाजारमुल्य दर तक्ते दरवर्षी १ एप्रिल रोजी प्रसिद्ध होत असल्याने मार्च महिन्यात दुय्यम निबंधक कार्यालयात मोठया प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे
पक्षकार किंवा नागरिकांना दस्त नोंदणीचे अर्ज जमा करणेसाठी शासकीय सुट्टीच्या दिवशी सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव व जळगाव जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरु राहणार आहे. अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी सुनिल पाटील यांनी दिली.