अल्पवयीन तरुणीचे आमिष दाखवून अपहरण
जळगाव,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी २ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरात घडली.
याबाबत अधिक असे की, आपल्या परिवारासह जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरात रहात असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला बुधवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. तिच्या नातेवाईकांनी पिडीत मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू ती कुठेही मिळून आली नाही.
अखेर २ ऑक्टोबर बुधवार रोजी रात्री १०.३० वाजता तिच्या पालकांनी जळगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करीत आहेत.