राज्य उत्पादन शुल्क जळगांव जिल्हा अधिक्षकपदी सीमा झावरे यांची नियुक्ती !
जळगाव (प्रतिनिधी)। राज्य उत्पादन शुल्क ( दारूबंदी) विभाग जिल्हा अधिक्षक पदी नव नियुक्ती करण्यात आली असून रायगड येथील अधिक्षक सीमा झावरे यांची जळगाव जिल्हा अधिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगावचे जिल्हा अधिक्षक नितीन धार्मिक यांनी आपल्या कार्यकाळात प्रामुख्याने लॉकडाऊनदरम्यान अनेक कारवाया गाजल्या त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती धार्मिक यांची बदली झालेली असून त्यांच्या जागी रायगड येथील अधिक्षक सीमा झावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक आणि निरिक्षकांच्या बदल्या सोमवारी करण्यात आल्या आहेत. तसेच श्रीरामपुर येथून निरिक्षक डी.पी. बगाव हे जळगाव येथे येणार असून त्यांच्या नियुक्तीचेही आदेश निघाले आहेत. त्यामुळे जळगावचे नवं जिल्हा अधिक्षक पदी सौ झावरे लवकरच पदभार स्वीकारणार आहे.