सेना-भाजप छुप्या युतीचा आरोपाच्या वादंगात गिरीशभाऊं व आ. चंद्रकांत पाटील यांची उघडपणे गुप्तगु !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज अक्षय काठोके : जिल्ह्यात शिवसेना भाजपची छुपी युती असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केल्यानंतर आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगरात आमदार चंद्रकांत पाटील यांची उघडपणे भेट घेऊन बंदद्वार चर्चा केल्याने आगामी निवडणुकां बघता राजकीय वर्तुळात तर्क वितर्काना उधाण आले आहे.
मुक्ताईनगर मतदारसंघात आ.चंद्रकांत पाटील यांची वाढती ताकद व एकनाथराव खडसे शिवसेना भाजपवर टीकेची झोड उठवली असतांना गिरीश महाजन यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. मागील विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रोहिणी खडसे यांच्या पराभव हा पक्षांतील लोकांमुळे झाल्याचा सांगत आ. गिरीश महाजनांसह त्यांच्या समर्थकांकडे बोट दाखव गंभीर आरोप केले होते. यातूनच पक्षांतर करून एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसेंनी कालच जिल्ह्यात शिवसेना व भाजपची छुपी युती असल्याचा आरोप केला नंतर लगेचच आज सायंकाळी मुक्ताईनगरात थेट माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी आ. चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने या टायमिंग महत्त्वाचा मानला जात असून येत्या निवडणूकांच्या बघता या भेटीला महत्त्व प्राप्त झाले असून राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.
गिरीशभाऊंचे कट्टर समर्थक मानले जाणारे तथा माजी जि.प. उपाध्यक्ष नंदू महाजन यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळत असून याप्रसंगी झालेल्या चर्चेचा तपशील समोर आला नसला तरी खडसेंनी केलेली सेना भाजप दोन्ही पक्षांनी छुपी युती केल्याचा आरोप आणि महाजन व पाटील यांची झालेली भेट यांच्यातील यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा मुद्दा बनला आहे हे मात्र खरे… आता या भेटीचे आगामी नगरपालिका निवडणूकामध्ये काय परिणाम होतात याकडे समर्थक देखील ऊसुक असल्याचे पाहायला मिळत आहे.