खळबळजनक : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, तिघा नराधमाना अटक
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एक संतापजनक तेव्हढीच खळबळ जनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला मुलांच्या वसतिगृहात नेत तिच्यावर तिघा नराधमांनी आळीपाळीने सामूहिक अत्याचार केल्याची हादरून सोडणारी दुर्दैवी घटना अकोल्यातून उघडकीस आली .
एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फसवून तिला अकोला शहरातल्या रामदास पेठ भागातील मुलांच्या वसतिगृहात नेण्यात आलं.त्यानंतर तिच्यावर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अंकुश वक्ते, अनुराग चौधरी आणि दिपक मडावी. असं अत्याचार करणाऱ्या तरुणांची नावे असून सिव्हिल लाईन पोलिसांनी पिडीत मुलीच्या कुटुबियांच्या तक्रारीवरुन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी तिघां नराधमांना अटक करण्यात आली आहे.