क्राईमचोपडाजळगाव

खळबळजनक : गणपती बाप्पाच्या आगमन दिवशीच जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून निर्घुण हत्या

जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l गणपती बाप्पाच्या आगमन दिवशीच जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकीकडे गणपती स्थापनेचे उत्सहपूर्वक वातावरण असताना सर्वत्र श्री गणेशाची स्थापना केली जात असताना गणपती स्थापनेच्या दिवशीच एका १४ वर्षीय मुलीला शेतात ओढत नेऊन त्या मुलीवर बलात्कार करून तिच्या डोक्यात दगड टाकून तिची हत्या केल्याची घटना शनिवार दि. ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता उघडकीस आली. या घटनेनं मोठी खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.

चोपडा तालुक्यात चोपडा शहरापासून १५ ते २० किलोमीटर असलेल्या गावात एक मोलमजुरी करणारा परिवार शेत शिवारामध्ये राहतो. या परिवारातील एक १४ वर्षीय मुलगी ही घराजवळ असताना संशयित आरोपीने या मुलीला शेतामध्ये ओढत नेऊन तिच्यावर बळजबरी करून अत्याचार केला. त्यानंतर तिची डोक्यात दगड टाकून निर्घुण हत्या केली. दरम्यान ही घटना आजूबाजूच्या ग्रामस्थांना समजताच त्यांनी तात्काळ चोपडा पोलीस स्टेशनला या बाबत माहिती दिली.

लागलीच चोपडा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच फॉरेनसिक टीम ला देखील देखील घटनास्थळी बोलावण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पिडीत मुलीचा मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याबाबत पोलिसांचे कामकाज सुरू होते. या बाबत रात्री उशिरापर्यंत चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, याप्रकरणी एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. एकीकडे गणपतीच आगमन दुसरीकडे मात्र चोपडा तालुक्यातील या घटनेने खळबळ उडाली असून या घटनेमुळे चोपडा परिसरासह जळगाव जिल्हा हादरला आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!