खळबळजनक : अल्पवयीन तरुणीवर चुलत भावासह दोघांचा बलात्कार, व्हिडिओही केला व्हायलर, तरुणी गर्भवती
जळगाव, मंडे टु मंडे न्युज | जळगाव जिल्ह्यातून एक अमानुष धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तिच्या चुलत भावाने बलात्कार केला त्याच बरोबर गावातील आणखी दोन जणांनी सुमारे पाच ते सहा वेळा बलात्कार करून तिचा व्हिडिओ केला. हा व्हिडिओ गावभर व्हायरल देखील केला. या अत्याचारातून ही १६ वर्षीय तरुणी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक घटना
चाळीसगाव तालुक्यातून समोर आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
१६ वर्षीय तरुणी चाळीसगाव तालुक्यातील एका गावात रहात असून तिचा चुलत भाऊ याने शेतामध्ये नेऊन तिच्याशी जबरदस्ती करून बलात्कार केला. तसेच कोणाला काही सांगू नये म्हणून धमक्या दिल्या. त्याच बरोबर नाना दीपक मोरे व पवन रावसाहेब मोरे या दोघांनी तरुणी घरी एकटी असताना जबरदस्तीने तिच्या घरात शिरून आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. कोणाला सांगितले तर घरच्यांना मारून टाकण्याची धमकी ही तरुणांनी पीडित तरुणीला दिली. अशी फिर्याद तिने पोलिस स्टेशनला दिली आहे.
तसेच त्यानंतर पुन्हा पुन्हा त्यांनी तरुणी घरी एकटी असताना पाहून तिच्यावर बलात्कार केला. तसेच तरुणी सोबत शरीरसंबंध करताना व्हिडिओ काढून त्यांनी गावात वायरल देखील केला.या अत्याचारातून सदर तरुणी ही गर्भवती देखील राहिली. या घटनेने चाळीसगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून
चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील करीत आहेत. दरम्यान या धक्कादायक घटनेमुळे चाळीसगाव तालुका हादरला आहे.


