खळबळजनक : महिलेची छेड काढण्याच्या संशयावरून जमावाच्या बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू
जळगाव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महिलेची छेड काढण्याच्या कारणावरून एका ईसमाला जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील आसोदा या गावी गुरुवार दि. ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहिती नुसार, भास्कर दगडू भंगाळे.वय ४३, रा. असोदा ता. जळगाव. हा व्यक्ती आसोदा गावात पत्नी व मुलासह राहत असून मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान गुरुवारी दि. ४ जुलै रोजी आसोदा गावातील गोकुळ नगर येथे तो गेला असता (केसीएन) त्याने मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून काही महिला व पुरुषांनी त्याला जाब विचारत काहींनी त्याला थेट मारहाण करायला सुरुवात केली.
मात्र या मारहाणीत भास्कर भंगाळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विन देवचे यांनी तपासून मयत घोषित केले.(केसीएन) दरम्यान घटनेप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच शासकीय रुग्णालयात येऊन घटनेची माहिती जाणून घेतली. दरम्यान, या घटनेबाबत आसोदा गावामध्ये खळबळ उडाली असून तालुका पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.