भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमप्रशासनयावल

खळबळजनक : यावल तालुक्यातील तीन ग्रामपंचायत सदस्य तीन – तीन अपत्य असल्याने अपात्र

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l तीन- तीन  अपत्ये असल्याने यावल तालुक्यातील परसाडे गावांमधील तीन ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ३० डिसेंबर रोजी काढले. तीन अपत्ये असल्याबाबतची तक्रार सिकंदर इस्माईल तडवी आणि कमल कान्हा तडवी दोन्ही रा. परधाडे ता. यावल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या कारवाई मुळे यावल तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, सन-२०२२ मध्ये यावल तालुक्यातील परधाडे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत खल्लोबाई युनूस तडवी, मदिना सुभेदार तडवी आणि रमजान छबु तडवी हे तीन उमेदवार ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूकीत निवडणूक लढवून निवडून आले होते.

दरम्यान, या निवडून आलेल्या तिघा उमेदवारांना तीन – तीन अपत्ये आहे अशी तक्रार सिकंदर इस्माईल तडवी आणि कमल कान्हा तडवी दोन्ही रा. परधाडे ता. यावल यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.

या बाबत जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे सुनावणी सुरू होती. जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाला चौकशीचे आदेश देवून तसा अहवाल पाठविण्याच्या सुचना दिल्या होत्या. अर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र दस्ताऐवज, यावल तालुका आरोग्य अधिकारी, यावल तहसील कार्यालय आणि यावल येथील वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या अहवालाचे अवलोकन जिल्हाधिकारी यांनी केल्यानंतर तिघांना तिसरे अपत्य असल्याचे सिद्ध झाले.

त्या नुसार  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी खल्लोबाई युनूस तडवी, मदिना सुभेदार तडवी आणि रमजान छबु तडवी या तिघांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र घोषित केल्याचे आदेश ३० डिसेंबर रोजी काढले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!