भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जळगाव जिल्ह्यातील गंभीर गुन्हे पोलीस आणि गुन्हेगारांच्या संगनमतानेच…एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात अज्ञातांनी गोळीबार केल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. भुसावळ शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसे हे कारमधून जात असताना कारवर अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये माजी नगरसेवक संतोष बारसेंसह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. यावरून पोलीस आणि गुन्हेगार यांचे संगनमत असल्याने जिल्ह्यात गंभीर गुन्हे घडत असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांनी केला आहे.

भुसावळ शहरात काल रात्री भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा निर्घृण खून हा करण्यात आला. जिल्ह्यात कुठे ना कुठे अशा मर्डरच्या घटना घडत आहेत. मागील आठवड्यात जळगाव शहरात देखील अशीच घटना घडली होती.असे एकनाथ खडसे म्हणाले.

पोलीस यंत्रणा आणि आरोपींचे संगनमत असल्याचा खडसेंचा आरोप
पोलिसांना आरोपी सापडत नसून पोलीस यंत्रणा आणि आरोपींचे संगनमत आहे.त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अशा गंभीर घटना घडत आहे. मी पोलीस अधीक्षकांची भेट घेत टोळी युद्ध, गुंडागर्दी जिल्ह्यात वाढली आहे यावर नियंत्रण आणावे, असे सांगितल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी एक शब्द देखील काढला नाही. यावरून जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा किती बिकट झाली आहे हे दिसून येते.असेही खडसे म्हणाले. यासंदर्भात पोलीस यंत्रणेने लवकरात लवकर या प्रकरणांचा तपास करून आरोपींना अटक केली पाहिजे, अशी मागणी मी सरकारकडे करणार असल्याचे शेवटी एकनाथ खडसे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!