जिल्हास्तरीय कृषी अधिकाऱ्यांचे मासिक चर्चा सत्र पिंपरुड प्रेक्षेत्र भेट कार्यक्रम
विरोदा,ता. यावल,मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी l महाराष्ट्र शासन, कृषि विभाग जळगांव जिल्ह्यातील सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उप विभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद जळगांव, कृषि विज्ञान केंद्र, पाल व केळी संशोधन केंद्र, जळगांव येथील केळीचे पिकाचे शास्त्रज्ञ आपल्या यावल तालुक्यातील सर्व कृषि अधिकारी / कर्मचारी यांचे जिल्हा स्तरीय मासिक चर्चा सत्र व प्रक्षेत्र भेट कार्यक्रमाचे आयोजन प्रभु अॅग्रो इंडस्ट्रीज्, पिंपरूड फाटा, पिंपरूड शिवार येथे प्रक्षेत्र भेटीच सुरूवात होऊन तेथील केळीच्या बुध्यापासुन धागा निर्मिती, ताप्ती दशपर्णी अर्क, ताप्ती एनर्जी (Plant Growth Regulator) निर्मीती पाहणी करून मार्गदर्शन केले.
पीएमएफएमई योजने अंतर्गत धान्य स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकेजींग युनिट ला भेट देऊन पाहणी केली. बामणोद येथील प्रसिध्द भौगोलीक मानांकन (जी.आय.) प्राप्त भरीत वांगी शेतीप्लाटचो पाहणी केली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत तुर अधिक सोयाबीन पिक प्रात्याक्षिक प्लॉट ची पाहणी केली. बामणोद येथील जावळे यांचे अनअरोबीक पध्दतीने द्रवरूप जैविक खते निर्मिती प्रकल्प नाविण्यपुर्ण बाब म्हणुन पाहणी करण्यात आली. बामणोद शिवारात केळी पिक शास्त्रज्ञ सोबत केळी पिक पाहणी करून पनामा सदृश्य प्रादुर्भावग्रस्त केळी बागेची पाहणी करून तपासणी साठी केळी बुंध्याजवळील माती केळी पिकाची मुळ तपासणीसाठी शास्त्रज्ञ मार्फत घेण्यात आली.
पीएमएफएमई योजने अंतर्गत कारखाना चौफुली फैजपूर येथील, समर्थ बेकर्स यांचे केळी पिठा पासुन बनविलेले पदार्थ तसेच गहु पासुन बनविलेले बिस्किट्स ची पाहणी करण्यात आली. प्रक्षेत्र भेटी नंतर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात करण्यात आले. बी. व्ही. वारे, ताकृअ, यावल यांनी सदर कार्यक्रमाची प्रस्तावना व रूपरेखा मांडण्यात आली. खरीप हंगामात राबविलेल्या प्रकल्पाबाबत माहिती देऊन रब्बी साठी करावयाच्या बाबी बाबत माहिती देण्यात आली. तसेच आपल्या तालुका सध्या असलेल्या पिक परिस्थिती बाबत माहिती देण्यता आली. कार्यक्रमासाठी आलेले सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे तालुका तालुका तर्फे आभार ए. जे. खैरनार, मंकृअ, किनगांव यांनी मानले.
सदर कार्यक्रमासाठी प्रभु ऍग्रो इंडस्ट्रिीज चे भुषण गाजरे यांचेही आभार मानुन कार्यक्रमताची सांगता करण्यात आली. सदर मासिक चर्चा व प्रक्षेत्र भेट कार्यक्रमास खालील अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले -कुर्बान तडवी सर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगांव, आर. एन. जाधव साहेब, उपविभागीय कृषि अधिकारी, पाचोरा, हंमत बाहेती सर, प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद, व्ही. टी. गुजर सर, शास्त्रज्ञ, केळी संधोधन केंद्र, जळगांव,अतुल पाटील सर, शास्त्रज्ञ, केव्हीके, पाल, दिपक साळुंके सर, तालुका कृषि अधिकारी, चोपडा, वाळके सर, तालुका कृषि अधिकारी, रावेर, देशमाने सर, तालुका कृषि अधिकारी, धरणगांव, ठाकरे सर, तालुका कृषि अधिकारी, अमळनेर, चव्हाण सर, तालुका कृषि अधिकारी, चाळीसगांव, श्रीमती धनश्री चास्कर मॅडम, तालुका कृषि अधिकारी, जामनेर, बी. व्ही. वारे सर, तालुका कृषि अधिकारी, यावल. सदर कार्यक्रम यशस्वी होणेसाठी यावल तालुक्यातील सर्व कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांचे सहकार्य राहीले.