सेठ ला.ना. सा.विद्यालयात इस्त्रो संस्थेच्या, वैज्ञानिकांच्या माहितीचे पोस्टर प्रदर्शनाचे उदघाटन
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना. सा.विद्यालयात बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता भारतातील सुप्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था इस्त्रो ने केलेली नेत्रदिपक प्रगती व भारतातील सुप्रसिद्ध संशोधक यांच्या वैज्ञानिक कार्याची माहिती असलेल्या पोस्टर प्रदर्शनाचे उदघाटन आर. टी. ओ.कार्यालयातील सहा.वाहन मोटर निरीक्षक उमेश सोलापुरे व रिक्षा युनियन चे अध्यक्ष दिलीप सपकाळे .शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक संजय भारुळे, पर्यवेक्षक प्रशांत जगताप, संजय वानखेडे यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले.
या पोस्टर प्रदर्शनात इस्रो या अवकाश संशोधन संस्थेने आतापर्यंत अवकाश संशोधन क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याची माहिती उदा. पृथ्वी ,इतर ग्रह ,आर्यभट्ट उपग्रह ,विविध रॉकेट प्रक्षेपण, मंगळयान. चांद्रयान,आदित्य एल्,1.मोहीम, अंतराळवीर,तसेच विविध शास्त्रज्ञ यांच्या माहितीचे पोस्टर लावण्यात आले असून शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदर्शन बघण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.अब्दुल कलाम सायन्स सेंटर चे पदाधिकारी सुनील वानखेडे, संजय वानखेडे, गौरव देशमुख, जावेद पटेल,श्रीमती नीलिमा सपकाळे, भगवान बारी, सौ.आडकमोल, बापू पाटील. अशोक पाटील, पंकज महाले, नितीन कोष्टी श्रीकांत घुगे , आनंद चौधरी, तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष परिश्रम लाभले.