भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

निंभोरा स्टेशन परिसरातील सांडपाणी शोषखड्डा प्रकल्प रखडल्याने गटारीचे पाणी थेट रस्त्यावर

निंभोरा बुद्रुक ता: रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील निंभोरा स्टेशन परिसरात ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांडपाणी प्रकल्प योजना रखडल्याने परिसरातील सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी पसरली असून रहिवाशांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे.


यासंदर्भात अधिक वृत्त असे की १५ व्या वित्त आयोग निधी मधून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुविधा म्हणून स्टेशन परिसरातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या व प्रलंबित अशा सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी येथील ग्रामपंचायत सदस्यांनी हा प्रश्न लावून धरल्याने ग्रामपंचायतीने निविदा प्रसिद्ध केली होती व  हे काम ठेकेदाराला दिले होते  मात्र हे काम उशिरा सुरू झाल्यामुळे सुविधा होण्याऐवजी दुविधा निर्माण झाल्याने संबंधित ठेकेदाराने हे काम सोडून दिले. परिणामी सुमारे एक वर्षापासून रखडलेले हे काम रहिवाशांचे हित लक्षात घेता पावसाळ्या अगोदर होणे गरजेचे आहे मात्र कामात सातत्य नसल्यामुळे व नियोजन शून्य कारभारामुळे विकासाऐवजी भकास असेच म्हणावे लागेल. यात ग्रामपंचायत प्रशासनाने काम दर्जेदार व वेळेच्या आत हे काम तातडीने झाले पाहिजे म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे.


ग्रामपंचायत स्थापनेपासून हा परिसर विकास कामांपासून वंचित असून पिछाडीवर आहे या परिसरातील रहिवाशांनी यापूर्वीही अनेक मातब्बरांना निवडून दिले आहे व त्यांनी याकडे लक्ष दिले नसून विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी या विषयात लक्ष देत सांडपाण्याच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न मार्गी लावण्याचे पुरेपूर प्रयत्न करावे लागत आहे व परिसरातील रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

प्रतिक्रिया
स्थानिक रहिवाशी
अक्षय नाना तायडे
प्रलंबित व रखडलेल्या सांडपाण्याच्या या प्रकल्पामुळे गटारीचे पाणी रस्त्यावर येत असून दुर्गंधी पसरली आहे व त्यामुळे रहिवाशांना नरक यातना भोगाव्या लागत आहे.

#गणेश पाटील#
ग्रामसेवक निंभोरा बु:
महिन्याच्या आत हा प्रश्न मार्गी लावून समस्या दूर होईल. संबंधित ठेकेदारांनी काम सोडल्यामुळे विलंब झाला.

# ग्रामपंचायत सदस्य#
सौ.शाहीन खाटीक
ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे व
ठेकेदाराच्या हलगर्जी पणामुळे ही दुरवस्था झाली असून त्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या रोषाला ग्रामपंचायत सदस्यांना सामोरे जावे लागत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!