भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

नशिराबादमध्ये गटार सफाई मोहीम युद्धपातळीवर

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | शहरातील स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत नशिराबाद नगरपरिषदेने आज (दि. ७ मार्च) शहरातील विविध भागांमध्ये गटार साफसफाईची मोहीम युद्धपातळीवर राबवली. सकाळपासूनच नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी विविध रस्ते व परिसरातील बंद पडलेल्या गटारींची साफसफाई करून साचलेला कचरा व घाण काढून टाकली. मुख्य रस्ते तसेच निवासी भागांमधील गटारांमध्ये साचलेली माती, प्लास्टिक व इतर कचरा काढून पाण्याचा निचरा सुरळीत करण्यात आला. या मोहिमेमुळे परिसरातील अस्वच्छता कमी होण्यास मदत झाली असून नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.


नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी लवकरपासून प्रत्यक्ष गटारांमध्ये उतरून कचरा व अडथळे दूर केले. काही ठिकाणी गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने पाण्याचा प्रवाह थांबला होता, तोही सुरळीत करण्यात आला. नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, गटारांमध्ये कचरा टाकू नये व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. शहर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमा पुढेही सातत्याने राबवल्या जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष योगेश पाटील,उपनगराध्यक्ष पंकज महाजन व आरोग्य सभापती चेतन बऱ्हाटे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!