भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमबोदवळ

लैंगिक अत्याचार करून फोटो – व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून पैशांची मागणी

बोदवड, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सोशल मीडियाच्या माध्यमातून बोदवड शहरातील २२ वर्षीय तरुणी बाहेर गावी शिक्षण घेत असताना गौरव मुकुंदा साठे. वय २३ वर्ष. रा. बोदवड. पीडित तरुणीशी याने ओळख निर्माण करून तरुणीशी जवळीक साधत विश्वास निर्माण करत पीडित तरुणीस जळगाव येथे एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

सदर तरुणाने लैंगिक अत्याचार करत असतानाचे फोटो काढून व्हिडीओही तयार केला. आणि तो व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडित तरुणीकडून वेळोवेळी पैशांची मागणी करत ऑनलाइन च्या माध्यमातून रक्कमही उकळली.

वेळोवेळी घडत असलेल्या पैशांच्या मागणीच्या प्रकाराला कंटाळून अखेर तरुणीने तिच्या आईला सांगितले. तिच्या आई- वडिलांनी पीडितेला विश्वासात घेत सर्व हकीकत जाणून घेतली.

यासंदर्भात बोदवड पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गौरव मुकुंदा साठे, वय २३ वर्ष. रा. बोदवड.  या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सदर गुन्हा हा जळगाव पोलिसांच्या हद्दीत घडल्याने शून्य क्रमांकने हा गुन्हा जळगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून दरम्यान, सदर तरुणाने पीडित तरुणीच्या आई – वडिलांना व तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी ही दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!