तरुणीवर लैंगिक अत्याचार,भाऊ व आई- वडिलांना जीवेठार मारण्याची धमकी
चाळीसगाव-मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l एका १९ वर्षीय तरूणीला दुसऱ्या तरुणीने घरी बोलावून तिला एका रूम मध्ये बंद करून तेथे आधीच येऊन बसलेल्या तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तसेच कुणाला सांगितले तर भाऊ, आई – वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना चाळीसगाव तालुक्यात घडली.
चाळीसगाव तालुक्यातील चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १९ वर्षीय तरूणी ही आई, वडील व भाऊ अशा आपल्या परिवारासह रहात असून जुलै २०२४ मध्ये तरूणीला गावात राहणारी पूजा शेळके हिनी घरी बोलावून तिला एका रूममध्ये ढकलून बाहेरून कडी लावून घेतली. यावेळी रूममध्ये आधीच येवून बसलेला समाधान बाळू शेळके याने जबरदस्ती तरूणीवर लैंगिक अत्याचार केला. तसेच या बाबत कुणाला सांगितले तर भाऊ, आई – वडीलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
त्या नंतर पुन्हा १६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता पिडीत तरुणीचे आई वडील समोर असताना तीच व्यक्ती समाधान बाळू शेळके याने दारू पिलेला असताना दारूच्या नशेत तरूणीचा हात पकडून तिच्याशी अश्लील चाळे करुन तिला आंगावर ओढले.
या संदर्भात पिडीत तरूणीच्या कुटुंबाने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पिडीत तरूणीच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.