अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार, तरुणाला अटक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर चोपडा येथे गेल्या २ वर्षांपासून लैंगिक अत्याचार होत असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी अविनाश पावरा यांचेवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीचे पोटदुखत असल्यामुळे तिचला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या वेळी तपासणीत ही मुलगी गरोदर असल्याची माहिती समोर आली.
या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून अविनाश वेस्ता पावरा (रा. अंमलवाडी, पो. उमर्टी, ता. चोपडा) याच्या विरोधात चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपड्या जवळील एका तालुक्यातील १७ वर्षीय मुलगी बारावीत चोपडा येथे शिक्षण घेत असून ती एका वसतिगृहात राहत होती. या मुलीशी अविनाश वेस्ता पावरा याने ओळख केली. त्या ओळखीचा फायदा घेत वेळोवेळी त्या तरुणाने पीडितेच्या मैत्रिणीच्या खोलीवर तसेच इतर ठिकाणी अत्याचार केल्याचे पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पो.नि. मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करत आहेत.


