भुसावळ मध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ शहरात तरुणीला काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या संदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही तरुणी मेघालय राज्यातील मूळ रहिवाशी आहे.
अधिक वृत्त असे की, मेघालय राज्यातील १८ वर्षीय तरुणी काम मिळविण्यासाठी गेल्या एप्रिल २०२४ पासून भुसावळ येथे राहत आहे. तिची मुन्नी नामक महिलेशी ओळख झाली. त्या नंतर ओळखीतून तिने पीडित तरुणीची चेतन नामक तरुणाशी ओळख करून दिली. पिडीत तरुणी काम बघत असल्याने चेतन याने सदर तरुणीला काम मिळवून देण्याचे आश्वासन देत आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. नेहमी तो पीडित तरुणीला काम मिळवून देतो असे सांगत अत्याचार करीतच होता.

काम न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने नेहमीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने अखेर बाजारपेठ पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. पिडीत तरुणीच्या तक्रारीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला चेतन नामक तरुण व मुन्नी नामक महिला यांचे विरोधात . निरीक्षक अमित कुमार बागुल हे पुढील तपास करीत आहेत.