महिला शिक्षिकेचा विनयभंग, शाळेचे चेअरमन व मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एका ४२ वर्षीय महिला शिक्षिकेला धक्काबुक्की करून अश्लिल शिवीगाळ करत शिक्षिकेचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना जळगाव शहरातील एका उर्दू शाळेत घडली. या संदर्भात २६ फेब्रुवारी बुधवार रोजी रात्री १० उशिरा शाळेचे चेअरमन आणि मुख्याध्यापक या दोघांवर जळगाव शहर पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका उर्दू शाळेत ४२ वर्षीय महिला शिक्षिका नोकरीला असून २८ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यानच्या काळामध्ये शाळेचे चेअरमन व मुख्याध्यापक या दोन दोघांनी महिला शिक्षिकेला धक्काबुक्की करून तिचा हात पकडून अश्लिल शिवीगाळ करत दमदाटी करून मनात लज्ज उत्पन्न होईल असे कृत्य करत शिक्षिकेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
असे अनेक वेळा शाळेत शिकवत असताना अश्लिल शिवीगाळ करत दमदाटी करून त्यांचा विनयभंग करण्यात आला असल्याने या नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर महिला शिक्षिकेने २६ फेब्रुवारी बुधवार रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून उर्दू शाळेचे मुख्याध्यापक आणि चेअरमन या दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भात पो कॉ प्रदीप पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
