खिरोदा येथे द्वितीय वर्षं बी.एड.च्या छात्राद्यापकांचा निरोप समारंभ संपन्न
सावदा,ता. रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। साने गुरुजी विद्याप्रबोधिनी सर्वसमावेशक शिक्षणशास्त्र महाविद्यालय खिरोदा येथे व्दितीय वर्षाच्या छात्राद्यापकांची पूर्व परीक्षा घेऊन त्यांचा आज निरोप देण्यात आला.
कार्यक्रममाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.टी. भूकन सर होते प्रतिमा पूजन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काजल चौधरी यांनी केले.यात वर्षभरात विविध गुणदर्शनकार्यक्रमात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नवल पाटील,संतोष पाटील,दीपाली तायडे, लिना वारके यांनी कॉलेज बद्दल मनोगत ऋण व्यक्त केले.आकाश की कोई सीमा, पृथ्वी का कोई तोल नही,साधू कि कोई जात नहीं पारस और पुरे हिंदुस्थान मे साने गुरुजी विद्याप्रबोधिनी खिरोदा जैसा बी.एड.कॉलेज नही-संतोष पाटील. वेळेचे नियोजन ठेवा, मेहनत करा, जीवनात खूप मोठे व्हा-डॉ भूकन सर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास प्रा. डॉ बी .जे. मुंढे, प्रा .डॉ .नाना लांडगे , प्रा .डॉ .पी .डी सूर्यवंशी, प्रा .डॉ .एस .आर रतकल्ले ,प्रा. सोनवणे तसेच बी .एड . प्रथम द्वितीय वर्ष सर्व छात्राद्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रक्षा पडावी ,साउंड नियोजन हरिश पाटील यांनी ,तर आभार जितेंद्र तायडे यांनी केले.. कार्यक्रमासाठी सागर,नवल प्रशांत ,दीपक,ईश्वर, पवन, मयूर, दाणी, तायडे,तसेच प्रथम वर्ष सर्व विद्यार्थी/विद्यार्थिनी यांनी आयोजन /नियोजन व मेहनत घेतली स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.