“भाजपा सोबतच्या मित्रपक्षांना हळूहळू संपवतो”, शरद पवारांचा गंभीर आरोप
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राज्यातील सत्तांतरानंतर बिहारमध्ये राजकीय उलथापालथ होत आहे नितीश कुमार यांनी भाजपसोबत असलेली युती तोडून मोठा धक्का दिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपा त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रपक्षांनाच संपवतो, असे म्हणत शिवसेना आणि जेडीयूकडे बोट दाखवत पवारांनी एकप्रकारे भाजपवर हल्लाबोल केला आहे.
- ब्रेकिंग : जळगाव जिल्हा परिषदेचा अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात, जिल्हा परिषदेत खळबळ !
- रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरू असलेल्या अल्पवयीन तरुणीवर पोलिसाचा अत्याचार
- “तु मला आवडतेस … ” महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग
पवार म्हणाले की, वेळीच सावध होत नितीश कुमारांनी शहाणपणाचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेवरही भजपाने आघात केला. भजपा मित्रपक्षांना दगा देतं हीच नितीश कुमारांची देखील तक्रार होती. नितीश कुमार यांनी भाजपसोबत घेतलेल्या फारकतीवर पवारांनी वरील वक्तव्य केलं आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचचं असून शिंदे गटाचं नाही असेही पवारांनी स्पष्ट केले आहे.
“भाजपा त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना हळूहळू संपवतो. कारण पंजाबमध्ये अकाली दल हा मोठा पक्ष त्यांच्यासोबत होता. प्रकाशसिंग बादल यांच्यासारखा मोठा नेता त्यांच्यासोबत होता. आज तो पक्ष जवळपास संपुष्टात आला आहे,” असा आरोप शरद पवारांनी केला.