भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

विधानसभा निवडणुकीबद्दल शरद पवार यांचं मोठं विधान, महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये तणाव?

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l लोकसभा निवडणुका संपल्या, या निवडणुकांमध्ये माहाविकास आघाडीला मोठे यश मिळाले, त्या मुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या व मित्र पक्षांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून मोर्चे बांधणीला जोरात तयारी सुरू केली असून अशातच आता शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीबद्दल मोठे विधान केले आहे. शरद पवारांच्या या विधानाने महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये तणाव निर्माण होऊन टेन्शन वाढलं आहे.

येत्या तीन महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत. राज्यातील लोकांना बदल हवा असल्याचं दिसत आहे. आपल्याला विधानसभा निवडणुकीत संधी आहे, असं लोकांना वाटतं. लोकसभेला आम्ही एकसंघ पर्याय दिला होता. विधानसभेसाठी आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे. आजच्या कार्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे. आम्ही त्याचा प्रयत्न करत आहोत. त्याला मूर्त स्वरुप आलं पाहिजे. मूर्त स्वरुप आलं तर लोकसभेसारखी स्थिती दिसू शकेल. नाही आलं तर आजचे राज्यकर्त्यांना याची किंमत मोजावी लागेल. पण लोकसभेसारखा स्पष्ट निकाल लागणार नाही, असं वाटतं”, असे थेट विधान शरद पवारांनी केल्याने माहाविकास आघाडीच्या घटक पक्ष्यांच्या नेत्यांचं मात्र टेन्शन वाढलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!