भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मुख्यमंत्रिपदा बाबत शरद पवार यांचं मोठं विधान, पवारांनी केली भूमिका स्पष्ट

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल अशी चर्चा सुरू असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका मुलाखतीत एक मोठं महत्वपूर्ण वक्तव्य केलं. त्यांनी म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र बसू, ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाला मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही पाठिंबा देऊ. अशी माझ्या पक्षाची भूमिका असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. शरद पवारांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीतील कांग्रेस व शिवसेना ठाकरे गट काय भूमिका घेतात यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठं यश मिळाल्याने काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढल्याचं दिसून आलं. त्यामुळे ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री अशी भूमिका काँग्रेसमधील काही नेत्यांनी घेतल्याची चर्चा होती. पण असं केल्यास मित्रपक्षांमध्ये आपले आमदार जास्त निवडून आणण्यासाठी सहकारी पक्षाचे आमदार पाडण्याची स्पर्धा लागू शकते असं ठाकरे गटाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यावर राष्ट्रवादीकडून मात्र कोणतीही भूमिका स्पष्ट होत नव्हती.

त्यामुळे महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही फॉर्म्युला जाहीर केला नाही किंवा मुख्यमंत्रिपदाचा चेहराही समोर केला नाही. परंतु आता महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!