रावेरसामाजिक

शशांक पाटील यांची अखिल भारतीय वीर गुर्जर प्रदेश संघटन महामंत्री पदी निवड

बलवाडी, मंडे टु मंडे न्युज, आशीष चौधरी | रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील रहिवाशी, प्रगतशील शेतकरी तसेच ग्रामपंचायत सदस्य असलेले शशांक मुकेश पाटील यांची अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा च्या प्रदेश संघटन महामंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शशांक पाटील रा.तांदलवाडी ता.रावेर यांना महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटनेची मोठी जबाबदारी देण्यात आली असून महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष नितीन चौधरी गुर्जर यांनी नुकतेच त्यांना नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन केले आहे.पाटील यांचे सर्व समाज बांधवांनी अभिनंदन केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!