भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

अमळनेरक्राईमजळगाव

” तिला प्रियकरा सोबत जायचे होते”.”सागर” ने “पूजा” साठी “तुषार” चा काढला काटा..

जळगाव जिल्ह्यातील विवाहित प्रेमी युगलांची प्रेमकहाणी

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l तुषार चिंधु चौधरी याचा खून दोंडाईचा मालपूर येथील सागर बापू चौधरी वय ३० याने केल्याचे निष्पन्न झाले असून तुषारची पत्नी पूजा आणि सागर यांच्यात लग्नापूर्वी प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपी पूजा तुषार चौधरी हिचे लग्नाआधीपासून नातेवाईक असलेल्या सागर बापू चौधरी याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र पूजाच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह तुषार चौधरी यांच्याशी लावून दिला. पुढे लग्नसंबंधातून त्यांना १ मुलगा, १ मुलगी झाले. वर्षभरापूर्वी पूजा हिचे परत सागरशी ओळख झाली. त्यात त्यांच्या भेटीगाठी सुरु होऊंन अनैतिक संबंध देखील सुरु झाले. यात सागरने पूजासोबत पळून जाऊन लग्न करण्याचे ठरविले. पुजाची देखील त्याच्या सोबत जाण्याची तयारी होती. हि गोष्ट सागरच्या पत्नीला माहित झाल्यावर त्यांच्यात वाद होऊन सागरची पत्नी हि माहेरी निघून गेली. तर दुसरीकडे मात्र याचा राग मनात धरून, सागर व पूजा यांनी तुषारला संपविण्याचा कट रचला.

सागर अनेकदा अमळनेर येथे येऊन तो पुजाला घेऊन बाहेर जात होता. सागर याला एक मुलगी असून त्याची पत्नी माहेरी निघून गेल्याने त्याने पूजाशी लग्न करायची इच्छा व्यक्त केली.सागर ने तुषार चा काटा काढण्याचा निर्णय घेतला. पूजा तुषार ला मारू नको असे सांगत होती. मात्र अडथळा कायमचा दूर करण्याचा निर्णय सागर ने घेतला होता. पूजाने सागर ला बोलावून घेतले होते. पती तुषार याला सांगितले की माझा नातेवाईक येत आहे तुम्ही त्याच्या सोबत पत्रिका वाटायला जा. सागर आल्यावर त्याने तुषार ला सोबत घेतले आणि दारू प्यायला घेऊन गेला आणि मंगरूळ येथे जाऊन त्याच्या डोक्यात दगड टाकून खून केला.

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात तरुणाचा खून झाल्याची घटना शुक्रवारी दि. ६ डिसेंबर रोजी उघड झाली होती. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी ६ तासातच संबंधित घटना उघड करून यशस्वी तपास लावला आहे. हि घटना अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता म्हणून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलीसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे फरार झालेला संशयित आरोपी प्रियकरासह मयताच्या पत्नीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

तुषार चिंधू चौधरी (वय ३७ रा.मारवड ता.अमळनेर ह.मु. प्रताप मिल, अमळनेर) असे मयत तरुण पतीचे नाव आहे. अमळनेर शहरातील प्रताप मिल परिसरात तुषार चौधरी हा तरूण पत्नी पुजा, २ मुलांसह वास्तव्याला होता. गुरूवारी दि. ५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून तुषार हा त्याचा ओळखीचा असलेला सागर चौधरी यांच्यासोबत अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे गेले होते. त्यावेळी दोघांनी सोबत दारू पिली. दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाला, यामध्ये दारूच्या नशेत सागर चौधरी याने तुषारच्या डोक्यात दोनवेळा दगड टाकून त्याचा निर्घृण खून करून पसार झाला होता.

दुसरीकडे रात्री उशिरापर्यंत तुषार हा घरी पोहोचलेला नव्हता. दरम्यान, शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता तुषारचा मृतदेह अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. यात तुषार चौधरी याच्या डोक्यात गंभीर घाव असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांनी चौकशीला सुरूवात केली. मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे संशयित आरोपी सागर चौधरी याला त्याच्या गावातून दोंडाईचाजवळच्या मालपूर येथून अटक केली. दरम्यान, हा खून अनैतिक संबंधातून केल्याची त्याने कबुली दिली.

त्यामुळे पोलीसांनी मयत तुषार चौधरी यांची पत्नी पूजा चौधरी हिलादेखील ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात मयत तरुणाचे चुलतभाऊ मधुकर धुडकु चौधरी (वय ५५, रा. मारवड) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर चौधरी (वय – ३५ रा.दोंडाईचा जि. धुळे) आणित पुजा तुषार चौधरी (रा. प्रताप मिल, अमळनेर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह कैलास शिंदे, मिलिंद सोनार, पोकॉ अमोल पाटील, पोकॉ निलेश मोरे, शेखर साळुंखे, प्रशांत पाटील, उज्वल म्हस्के, विनोद संदानशीव, जितेंद्र निकुंभे, नितीन कापडणे, होमगार्ड पूनम हटकर यांनी हि कारवाई केली आहे.

गुरुवारी रात्री पूजाने पती तुषारला सागरची भेट घेऊन त्याला मदत करण्याविषयी सांगितले. त्यावेळी सागरने दारू आणि चिकन आणून व त्याचे आमिष तुषार याला दाखवित मंगरूळ येथील एमआयडीसी भागात नेले. तेथे भरपूर दारू तुषारला पाजल्यावर संशयित आरोपी सागरने तुषारच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. त्यानंतर सागर हा त्याच्या मंगरूळ गावी निघून गेला. नंतर मोबाईल सीडीआर, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने केवळ ६ तासात तपास लावून संशयितांना अटक केली आहे. तुषार याची अंत्ययात्रा झाल्यानंतर पूजाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. खुनाचा तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!