एकदा पराभव झाला म्हणून खचून जाऊन जनसेवेचे व्रत सोडणार नाही– सौ. रोहिणी खडसे
मस्कावद ता. रावेर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या दरम्यान रावेर तालुक्यातील उदळी, मस्कावद खु ,बु ,सिम येथे ग्रामस्थां समवेत रोहिणी खडसे यांनी संवाद साधला
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या, रावेर तालुक्यातील हा भाग मुक्ताईनगर मतदारसंघाला जोडल्या नंतर कायम एकनाथराव खडसे यांच्या पाठीशी उभा राहिला आहे त्यानी सुद्धा या गावांना विकास कामांसाठी सतत निधी उपलब्ध करून दिला आहे सर्व गावांना चहूबाजुनी डांबरी रस्त्यांनी जोडले आहे गावा अंतर्गत विविध विकास कामांना निधी उपलब्ध करून दिला आहे तिन वर्ष आमदार नसल्याने विकास थंडावला होता आता एकनाथराव खडसे हे विधानपरिषदेचे आमदार झाले आहेत राहिलेले विकास कामे त्यांच्या व पक्षाच्या माध्यमातून पुर्ण करण्यात येतील गेल्या विधानसभा निवडणुकीत मला सुद्धा तुम्ही भरभरून मतदान केले थोडक्या मतांनी माझा पराभव झाला परंतु “एका पराभवाने मी खचून जाणार नाही. निवडणुका येतील आणि जातील परंतु मी घेतलेला जनसेवेचा वसा कधी सोडणार नाही.
मी जन संवाद यात्रेच्या माध्यमातून मुक्ताईनगर मतदारसंघातील जन सामान्यापर्यंत पोहचुन गावागावातील सामूहिक समस्यासह वैयक्तिक अडिअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचे हे प्रश्न नाथाभाऊंच्या माध्यमातून सोडवण्यासाठी पक्ष पदाधिकारी आणि मी स्वतः सतत पाठपुरावा करणार आहे.मी कायम जनसेवेसाठी वचनबद्ध राहील” असा विश्वास रोहिणी खडसे यांनी उपस्थिताना दिला. नाथाभाऊनी केलेल्या विकास कामामुळे तुमच्या चेहऱ्यावर आज जे समाधान दिसत आहे….हीच आमची पुण्याई आहे ,जेव्हा केव्हा हाक द्याल तेव्हा मी आपल्या सेवेसाठी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह हजर राहीन असे आश्वासनही त्यांनी उपस्थिताना दिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी सुरू असुन आपण जास्तीत जास्त संख्येने सभासद व्हावे असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले
रोहिणी खडसे यांचा निवडणुकीत पराभव झालेला आहे त्यांचे कडे कोणतेही पद नाही तरी त्यांच्या रक्तात जनसेवा आहे म्हणून त्या गावोगावी जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत आपण मांडलेल्या समस्या एकनाथराव खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही सर्व सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू आपण सर्वांनी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन राजेश वानखेडे यांनी केले याप्रसंगी यात्रेत रोहिणी खडसे यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य कैलास सरोदे, सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील, किसान सेल सोपान पाटील, दूध संघ संचालक जगदीश बढे, तालुका अध्यक्ष निळकंठ चौधरी, यु डी पाटील, सुनिल कोंडे , योगिता वानखेडे, वाय डी पाटील, कुशल जावळे, मेहमूद शेख, अतुल पाटील हिरामणजी बा-हे,
नंदकिशोर हिरोळे, माया बारी, अमोल महाजन, शांताराम पाटील, शशांक पाटील, श्रीकांत चौधरी, देवानंद पाटील, ललित पाटील, कुणाल महाले, सिद्धार्थ तायडे, योगेश्वर कोळी, भागवत कोळी, कमलाकर पाटील, रविंद्र पाटील, प्रदिप साळुंखे, बाळाभाऊ भालशंकर, कैलास कोळी, राजेंद्र चौधरी, जितेंद्र चौधरी, गौरव वानखेडे, एकलव्य कोल्हे, जिवन बोरनारे, विशाल रोठे, नितीन पाटील, शुभम मुर्हेकर, रोहन च-हाटे, नवाज पिंजारी, अक्षय सोनवणे, केतन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी होते