शिंदे सेनेकडे फक्त पाच हजार मते राष्ट्रवादी तालुकाध्यक्षाचा मुक्ताईनगर मतदारसंघाबाबत दावा
मस्कावद, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांच्या प्रभावामुळे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वलयामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांना 92हजार मते मिळाली होती, तर रोहिणी खडसेना 90हजार मते मिळाली होती, या 92हजारापैकी तब्बल 82हजार मते राष्ट्रवादी काँग्रेसची असून उर्वरित 10हजार मते शिवसेनेची होती, सद्यस्थितीत या 10हजार पैकी शिंदे सेनेकडे फक्त 5हजार मते असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष यु डी पाटील यांनी केला आहे. जनसंवाद यात्रेत ते रावेर तालुक्यातील मस्कावद येथे बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे हे गद्दारांचा महानेता म्हणजे या 40 चोरांचा महाचोर असून या 40 चोरांना पुढील निवडणुकीत सुरक्षित करण्यासाठी ते मुक्ताईनगरला येत आहे. मात्र पुढील निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना फारतर 20हजार मते मिळतील असे सांगत रोहिणी खडसे भावी आमदार राहतील असा दावाही पाटील यांनी केला. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर भाजपा शिंदे सेनेला कचऱ्यासारखे बाजूला सारतील, त्यानंतर त्यांना कोणीच वाली राहणार नाही असे सांगून भविष्यात त्यांच्यासमोर भाजपा प्रवेशाशिवाय दुसरा कोणताचा मार्ग असणार नाही असे संकेतही त्यांनी दिले. ज्यांच्या भरोसे आ. पाटील निवडून आले, त्या रविंद्र भैय्या पाटील यांना विजयी झाल्यावर 15 दिवसात बाजूला केले असा आरोप त्यांनी केला.
कोणत्याही उदघाटनाच्या कार्यक्रमाला सुद्धा बोलवले नाही. श्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्याचा घाट घातल्याचा आरोप करून जो शरद पवाराना, उद्धव ठाकरेना आणि रविंद्र भैय्यांना झाला नाही तो विश्वास ठेवण्यायोग्य नसल्याचे म्हणत त्यांनी टीकास्त्र डागले. याप्रसंगी, मुक्ताई मंदिरातील पेट्या कोणाच्या घरी जातात?असा आरोप पत्रकार परिषदेत करून त्यांनी वारकऱ्यांचा अवमान केला आहे. मुक्ताईनगर पासून पंढरपूर पर्यंत ऍड रविंद्र पाटील नाव आहे. देवमाणूस म्हणून त्यांचा सन्मान केला जातो,आ पाटील यांनी त्यांच्यावर आरोप करून वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत, ही अतिशय दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या चौदाव्या दिवशी रावेर तालुक्यातील उदळी खु, बु ,मस्कावद खु ,बु ,सिम येथे ग्रामस्थां समवेत संवाद साधला