भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे गाडीच्या भीषण अपघातात निधन

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं कार अपघातात निधन झालं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ विनायक मेटे यांच्या वाहनाला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास अपघात झाला होता.

विनायक मेटे हे आपल्या चालक आणि सुरक्षारक्षकासह बीडहून मुंबईकडे येत होते. मात्र खालापूर टोलनाक्याजवळ गाडी बोगद्यात जाताच भीषण अपघात झाला. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर मेटे यांना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यात अडचणी आल्या. अखेर काही वेळानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र अपघाताचं स्वरुप भीषण असल्याने मेटे यांना हाताला आणि डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही.

या अपघातात मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे उपचार सुरू असतानाच मेटे यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून सक्रिय असलेल्या मेटे यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!