जिल्ह्यात शिवसेना-भाजपची छुपी युती, आगामी निवडणुकात आघाडी की स्वतंत्र लढायचं हा निर्णय वरिष्ठ पातळीवर– एकनाथ खडसे
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा :
आगामी काळात येऊ घातलेल्या नगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वतंत्र लढवायच्या की महाविकास आघाडीच्या माध्यमातून याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचे स्पष्ट करत जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपची छुपी युती असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सेना भाजपवर निशाणा साधला आहे.
खडसे पुढे बोलतांना म्हणाले, खासदार नवनीत राणा स्वतःच्या ताकदीने नव्हे तर शरद पवार आणि राष्ट्रवादीचा टेकू घेऊन निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे अगोदर स्वतःची ताकद निर्माण करा मगच मुख्यमंत्री यांना आव्हान देण्याची भाषा करा.” असा टोला लगावत तुम्हाला आव्हान देते लोकांमध्ये येऊन निवडणूक लढून निवडून दाखवाच. महाराष्ट्रात कोणताही जिल्हा निवडा. तुमच्या विरोधात मी उभी राहते. तुमच्यात दम असेल तर निवडून दाखवा. या राणांच्या आव्हानावर खडसेंनी भाष्य केले आहे.
तसेच बोदवड नगरपरिषदेच्या निवडणुकी बाबत बोलतांना खडसे म्हणाले, या निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस असे सर्व पक्ष स्वतंत्र लढले परंतु, भाजपने शिवसेनेला संपूर्ण पाठिंबा देत भाजप व शिवसेनेची छुपी युती होती. तशीच जिल्ह्यात शिवसेना व भाजप छुपी युती आहे असे सांगत त्यांनी सेना भाजपवर निशाणा साधला आहे.