बोदवड बाजार समितीत आ. एकनाथ खडसेचा जलवा; सेना भाजपचा सुपडा साफ !
बोदवड/मुक्ताईनगर मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी | येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रणीत पॅनलने शिवसेना भाजप युतीच्या पॅनलचा सुपडा साफ करत दणदणीत विजय मिळवला आहे केला. आमदार चंद्रकांत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादीच्या पॅनलला शिवसेना व भाजपच्या पॅनलने तगडे आव्हान उभे करत आमदार एकनाथराव खडसे विरूध्द आमदार चंद्रकांत पाटील असा सामना निवडणुकीत रंगल्याचे पहायला मिळाले होते. निवडणुकीच्या काळात दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. या अनुषंगाने निवडणूक चुरशीची झाली. बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यासह भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव परिसराचा समावेश आहे. यामुळे तीन तालुक्यांची एकमेव बाजार समिती म्हणून या मार्केट कमिटीचा लौकीक आहे.
अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या या बाजार समितीवर गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून आमदार एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून बाजार समितीवर भाजपची सत्ता होती. मात्र, आता ते राष्ट्रवादीत असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे स्वतंत्र पॅनल मैदानात उतरवत निवणुकीत खडसेंनी आपली सत्ता कायम राखली आहे.
राष्ट्रवादीच्या पॅनलने १८ पैकी तब्बल १७ जागा जिंकून दणदणीत विजय संपादन असून शिवसेना भाजप महायुतीच्या पॅनलला अवघ्या १ जागेवर विजय मिळवण्यात यश आले. या विजयामुळे एकनाथराव खडसे यांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार चंद्रकांत पाटील यांना धक्का बसला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी प्रणीत पॅनलचा विजय दृष्टीपथात आल्याबरोबर समर्थकांनी जोरदार जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.