भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

आम्ही शिवसेनेतच… राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाने शिवसेनेला हायजॅक केलं,’– एकनाथ शिंदे गट

गुवाहाटी, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : आमदारांच्या अपत्रतेच्या नरहरी झिरवळ यांच्या या निर्णयाला शिंदे गट कोर्टात आव्हान देणार आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाची आज अधिकृत पत्रकार परिषद झाली. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी या पत्रकार परिषदेत शिंदे गटाची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आपण शिवसेनेला हायजॅके केलेलं नाही. तर राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाने शिवसेनेला हायजॅक केलं, अशी भूमिका मांडली. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जात आहोत. आम्ही शिवसेनेचेच सदस्य आहोत. आम्ही कुणाच्याही दबावाखाली बंड पुकारलेलं नाही. एकनाथ शिंदे हे आमच्या गटाचे नेते आहेत. आम्ही शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले आहोत. आमच्याकडे दोन तृतीयांश सदस्य आहेत.

आम्ही महाराष्ट्रातून निघाल्यानंतर कमी वेळा बोलण्याची संधी मिळाली. आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी मला प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्याची सूचना केली आहे. लोकांमध्ये गैरसमज निर्माण झालाय की आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो आहोत. पण शिवसेना पक्षातच आहोत. आम्ही सर्वजण शिवसेनेचे सदस्य आहोत. पक्षाच्या आमदारांच्या मताप्रमाणे निर्णय होणे अपेक्षित असतं. त्यांचे काही अधिकार आणि निर्णय असतात. आपल्या राज्यामध्ये विविध काम करावेत, अशी त्यांची अपेक्षा असते. तसेच सरकार चांगलं चालावं ही आपली जबाबदारी आहे म्हणून आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना अनेकदा सूचवलं होतं. युतीमध्ये आपण लढलो, त्यांच्याचबरोबर राहू या, असा निर्णय सर्व आमदारानी घेतलेला होता.

कित्येक दिवस आम्ही सर्व उद्धव ठाकरे यांना सांगत होतो. ते पुढे सुद्धा आमचं ऐकतील, अशी आमची भावना आहे. एवढं सर्व सांगत आहेत तर त्याला काहीतरी कारण असेल. आम्हाला कुणीही सांगितलेलं नाही. आम्ही स्वत:हून निर्णय घेतलेला आहे. एकनाथ शिंदे आम्हाला नेते म्हणून उद्धव ठाकरे यांनीच दिले आहेत. त्यांच्या संपर्कात सर्व आमदार होते. सर्वांनी मिळून ठरवले. जे तृतीयांश बहमुताचा विषय हा संविधानिक आहे.

२/३ बहुमताचा निर्णय ही घटनात्मक तरतूद असते ती आमच्याकडे आहे. आमचे ५६ आमदार होते, आता ५५ आहेत. १६ जण एकत्र येऊन गटनेते निवडू शकत नाहीत. कोर्टात चॅलेंज करणार आहोत, आला तो मान्य नाही, आम्ही पक्ष सोडलेला नाही, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. आमच्या गटाचे नेते एकनाथ शिंदे असतील, असं दीपक केसरकर म्हणाले. व्हिप हा सभागृहात बजावला जातो. मीटिंगला नाही आलात तर डिसकॉलिफाय व्हाल, हे घाबरवण्यासाठी केलं जात असल्याचं दीपक केसरकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!