शिवसेना v/s शिवसेना….मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधात ठाकरे गटाचा ” हा ” तगडा उमेदवार !
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध कोण उमेदवार राहील या कडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीत कोपरी पाचपाखाडी हा मतदार संघ उद्धव ठाकरे गटाकडे गेल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यादी ६५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत कोपरी पाचपाखाडीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी तगडा उमेदवार उभा केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदें विरोधात महाविकास आघाडीतून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते.
शिवसेना ठाकरे गटाने आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. कोपरी पाचपाखाडी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ आहे. ते या मतदारसंघातून २००९ पासून आमदार आहे. परंतु, २०२२ मध्ये झालेल्या शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन प्रमुख गट पडले. आता धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना येथून उमेदवारी देण्यात आल्याने शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना असा सामना रंगणार.