मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या स्थायी समित्यांवर शिवसेनेचे प्राबल्य : पाचही सभापती पदांची निवडणूक बिनविरोध
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पाचही स्थायी व विषय समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेत प्रतिस्पर्धी नामनिर्देशन अर्ज न आल्याने उपाध्यक्ष पदसिद्ध सभापती पद वगळता शिवसेनेच्या नगरसेवकांची व नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांची चारही स्थायी विषय समितीच्या सभापती पदावर बिनविरोध नियुक्ती झाली असून याची अधिकृत घोषणा पिठासिन अधिकारी तहसिलदार श्वेता संचेती यांनी केली .
स्थायी व विषय समित्या खालील प्रमाणे सभापती निवड
1) सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदी संतोष सुपडू मराठे
2)स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती पदी नुसरतबी महेबूब खान
3) पाणीपुरवठा व जलनिस:रण समिती मुकेशचंद्र कैलास वानखेडे
4)महिला व बाल कल्याण समिती सभापती सविता सुभाष भलभले
5)शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती उपाध्यक्ष मनीषा पाटील ( पदसिद्ध)
यावेळी प्रसंगी मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड , कार्यालयीन अधीक्षक दीपक जग्रवाल, कर निरीक्षक अच्युत निल, सभा लिपिक मयूर महाजन, उपनगराध्यक्ष प्रभारी नगराध्यक्ष मनीषा पाटील, गटनेता निलेश शिरसाट, गटनेता राजेंद्र हिवराळे, नगरसेवक मुकेशचंद्र वानखेडे , संतोष कोळी , पियुष मोरे, संतोष मराठे , शे. शकील खाटिक नगरसेविका सविता भलभले, शबानाबी अब्दुल आरिफ, बिलकीसबी अमाउल्ला खान, नुसरतबी महेबूब खान, साधना ससाणे, कुंदा पाटील , नगरसेवक ललित शांताराम महाजन , डॉ प्रदीप पाटील उपस्थित होते.