भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Uncategorized

एकनाथ शिंदेंसोबत २९ आमदार, जिल्ह्यातील आमदारांचा समावेश !

सुरत, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे दोन डझनपेक्षा जास्त आमदार त्यांच्या संपर्कात असून सध्या त्यांच्यासोबत १३ आमदार गुजरातच्या डी मेरिडिअन हॉटेलमध्ये आहे. शिंदेंसोबत असलेल्या आमदारांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि मराठवाड्या, जळगाव जिल्ह्यातील ही आमदारांचा समावेश आहे. शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीबद्दल प्रचंड नाराजी असून महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदेंसोबत २९ हून अधिक आमदार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजतेय. यामध्ये शिवसेनेच्या डझनभर आमदारांचे मोबाईल नॉट रिचेबल असून यापैकी काही जण शिंदेंसोबत गुजरातमध्ये असल्याची माहिती आहे. शिंदे यांच्या सोबत जलगावमधील आमदारंगाचा समावेश असल्याची वृत्त एका वृत्त वहिनीने दिले आहे यात गुलाबराव पाटील, किशोर पाटील, चिमणराव पाटील, लता सोनवणे यांचा समावेश आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क झाला नाही मात्र, मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्या स्वीह सहाय्यक यांच्याकडून हे मुंबईत असल्याचे सांगण्यात आले आहे.

भाजपचे केंद्रीय नेते आणि राज्यातील अनेक नेते एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून यामुळे महाराष्ट्रात राजकीय उलथापात होण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान यामुळे शिवसेनेत होणारी फाटाफूट रोखण्यासाठी आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांचा पूर्वनियोजित दिल्ली दौरा रद्द केला आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या देखील बैठकांना वेग आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे पक्ष नेतृत्त्व आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असून ते सध्या गुजरातच्या ली मेरिडिअन हॉटेलमध्ये आहे. त्यांच्यासोबत १२ हून अधिक आमदार असून आता शिवसेनेत फूट अटळ आहे. या घडामोडींमुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिल्ली दौरा आटोपता घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे ली मेरिडिअन हॉटेलमध्ये असून त्या हॉटेलबाहेर कडक पोलीस बंदोबस्त आहे. यादरम्यान भाजपचे नेतेही एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहे. हा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप असून एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री गुजरातमध्ये जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे यांच्यासह १२ आमदार हे गुजरातमध्ये आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!