मविआ सरकार संकटात : एकनाथ शिंदे तख्त पलटवणार? १३ आमदारांसह नॉट रीचेबल !
सूरत, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : विधान परीषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय भूकंप आला आहे. राज्यात बैठकांचं सत्र जोर धरत आहे. या निकालानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीची अनेक मतं फुटलेली आहेत. अशात आता शिवसेनेचे एकनाथ शिंदेही नॉट रिचेबल असून ते 13 आमदारांसोबत गुजरातच्या सुरतमध्ये असल्याचं समोर आलं आहे.
- संपूर्ण जळगाव जिल्हा भगवामय, जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ११ जागा महायुतीच्या ताब्यात
- मुक्ताईनगर मध्ये लक्षवेधी लढतीत पुन्हा महायुतीचे चंद्रकांत पाटील विजयी, रोहिणी खडसे पराभूत
- रावेर मधून महायुतीचे अमोल जावळे ४३ हजारांच्या वर मतांनी विजयी
सूरतमधील ली मेरिडिअनमध्ये हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे थांबलेले आहेत. हॉटेलबाहेर कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. याच हॉटेलमध्ये ते १३ आमदारांसोबत आहेत. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून खदखद सुरू होती, असं समोर आलं आहे. मराठा समाजाच्या विषयावरून ही खदखद टोकाला गेली होती. यातून एकनाथ शिंदे यांना बाजूला करून मराठा समाजाची थेट मनं जिंकण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू होता.त्यासाठी विनायक राऊत यांना पुढे करून मराठा समाजाच्या नेत्यांशी बैठका सुरू होत्या.
येत्या दोन दिवसात मराठा समाजाच्या नेत्यांशी मुख्यमंत्री थेट बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार होते. मराठा समाजाचे शैक्षणिक प्रश्न आणि नोकर भरती बाबत ही बैठक होणार होती. त्यासाठी एकनाथ शिंदेना डावलून विनायक राऊत यांना मुख्यमंत्र्यांनी पुढे केले होते. मुंबईतील एका हॉटेलमध्ये या गाठीभेटी झाल्या होत्या. मराठा क्रांती मोर्चाला याबाबत पत्रही मुख्यमंत्र्यांनी द्यायला लावलं होतं.