एकनाथ शिंदेसह १२ जणांची आमदारकी रद्द करा; ठाकरे समर्थ शिष्टमंडळाचे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : एकनाथ शिंदे समर्थ गटांतील बंडखोर आमदारांच्या विरोधात ठाकरे समर्थक शिवसेनेने मोठी खेळी केली आहे. शिवसेना नवनियुक्त गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र दिलं आहे. विधानसभेच्या विधीमंडळ बैठकीस गैरहजर राहाणाऱ्या १२ आमदारांवर कारवाई करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
- मधुमेह, हृदयरोग, गंभीर स्वरूपाचा संसर्ग सह ९०० औषधांच्या किंमतीत वाढ
- वाळूचे अवैध उत्खनन रोखण्यात अपयश, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार निलंबित, दोघे भ्रष्टाचारात लिप्त असल्याचा चौकशीत ठपका
- मुक्ताईनगर/बोदवड तालुका व शहर काँग्रेस कमिटी आढावा बैठक संपन्न….
शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना उपस्थित राहण्याचं पत्र काढलं होतं, यावर एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली. या आरोप प्रत्यारोपांनंतर शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र देत बंडखोर आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे.
जे आमदार उपस्थित राहिले नाहीत अशा एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संजय सिरसाड, प्रकाश सुर्वे, लता सोनवणे, संदीपान भुमरे, भरत गोगावले, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे अश्या 12 आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे, उर्वरित आमदार आमच्या सोबत असल्याचा दावाही अजय चौधरी यांनी केली आहे.