भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

धक्कादायक : १६ बांगलादेशी घुसखोरांना अटक, निवडणुकांमध्ये मतदान केल्याचे उघड, सरकारी योजनांचाही घेतला लाभ

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l बांगलादेशी घुसखोरांबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई ,ठाणे, नवी मुंबई, पनवेल मधून १६ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. राज्यभरात बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचे प्रमाण खूप वाढले आहे. कित्येक घुसखोर बांगलादेशी नागरिक बनावट कागदपत्राचा आधारे भारतीय असल्याचे पुरावे तयार करून वर्षानुवर्षे मुंबई,पुणे, ठाणे, नवी मुंबई इत्यादी शहरात वास्तव्यास आहेत. तसेच या घुसखोरांकडून सरकारी योजनांना लाभ घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड देखील झाले आहे. व त्याच आधारे घुसखोर बांगलादेशी निवडणुकीत मतदानही केल्याचं उघड झालं आहे.

मुंबई पोलिसांनी घुसखोर बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. चेंबूर आरसीएफ येथून ७ घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती, दरम्यान शनिवारी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली गठीत करण्यात आलेल्या विशेष पथकाने शनिवारी नवीमुंबईतील कळंबोली, पनवेल, कोपरखैरणे, कल्याण, मुंब्रा मुंबईतील शिवडी दारुखाना, मानखुर्द, चेंबूर इत्यादी ठिकाणाहून १६ बांगलादेशी घुसखोराना अटक केली आहे. या घुसखोराकडून आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी कागदपत्रे जप्त करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. मुंढे यांनी दिली आहे.

मुंबई पोलिसांसह राज्यातील इतर पोलीसांकडून मागील काही महिन्यांपासून बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांच्या या कारवाईत अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांकडून धक्कादायक माहिती समोर आली तसेच त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या बोगस पत्रावरून या बांगलादेशी नागरिकांनी भारतातील निवडणुकांमध्ये मतदान केल्याचे देखील समोर आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!