भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचाळीसगावजळगाव

धक्कादायक : ८२ वर्षीय वृद्धेवर ३० वर्षीय तरुणाचा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

जळगाव, मंडे टु मंडे न्युज | एका ८२ वर्षीय वृद्ध महिलेवर एका ३० वर्षीय तरुणाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव तालुक्यात घडला. चाळीसगाव तालुक्यातील एका गावात ८२ वर्षीय वृद्ध महिला घराच्या बाहेर खाटेवर झोपली असता तिच्यावर ३० वर्षीय तरुणाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वृद्ध महिलेने आरडाओरडा केल्याने घरातून मुलगा, सून यांनी तरुणाच्या तावडीतून महिलेला सोडवले. या धक्कादायक प्रकाराने संताप व्यक्त केला जात आहे.

अधिक वृत्त असे की, मंगळवार दि. २ सप्टेंबर रोजी रात्री ही वृद्ध महिला पोर्चमधील ओट्यावर असणाऱ्या खाटेवर झोपलेली होती. आणि महिलेचा मुलगा, सून, नातू हे घरात झोपलेले होते. मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास वृद्ध महिला गाढ झोपेत असताना अचानक तिच्या अंगावर कोणीतरी मिठी मारून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यातून महिला  स्वतःची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करीत असताना तिने आरडाओरड करीत असताना तिला विजेच्या प्रकाशात राहुल बापू केदार (वय ३०) हा दिसून आला.

महिलेने आरडाओरड केल्याच्या आवाजाने महिलेचा मुलगा, सून आणि नातू हे घराबाहेर आले. त्यांनी महिलेला मिठी मारलेल्या तरुणाला सोडवण्याचा प्रयत्न केला. तरी देखील तो महिलेला सोडत नसल्याने मुलगा व इतरांनी त्याला काठीने मारून सोडवण्याचा प्रयत्न केला. राहुल केदार याच्या पायावर काठीने मारले तेव्हा त्याने सदर वृद्ध महिलेला सोडून पळू लागला. ग्रामस्थ जेव्हा तरुणाच्या मागे धावत गेले तेव्हा तो त्याच्या घरात घुसल्याचे महिलेच्या मुलाने व ग्रामस्थानी पाहिले तो राहुल बापू केदार हा होता. सदर संघटनेने वृद्ध महिला प्रचंड घाबरलेली होती. या प्रकरणी राहुल बापू केदार वय ३० वर्ष यांचे विरोधात चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!