धक्कादायक : ३० वर्षीय मतिमंद युवकावर ६७ वर्षीय वृद्धाचा अतिप्रसंग
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचोरा तालुक्यातील एका गावात ३० वर्षाच्या मतिमंद युवकावर वृद्धाने शेतात अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार २१ मार्च रोजी सायंकाळी घडला. ६७ वर्षांचा संशयीत आरोपी या घटनेनंतर फरार झाला होता. मात्र नंतर त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यात एका गावातील बस स्थानकाजवळ एक ३० वर्षीय मतिमंद मुलगा वावरत होता. दरम्यान गावातीलच एका वृद्धाने मतिमंद तरुणाला गोड बोलुन गावाजवळील शेतात नेले. तेथे त्याच्यावर अतिप्रसंग केला. ही घटना शेतात मधमाश्यांचे पोळे काढण्यासाठी गेलेल्या काही युवकांनी पाहिली. त्यांनी त्या वृद्धाला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो घटनास्थळावरुन पसार झाला.
दरम्यान पीडित मतिमंद युवकाच्या वडिलांनी पाचोरा पोलीस ठाणे गाठून आपल्या मुलासोबत झालेला अतिप्रसंग कथन केला. ही घटना पाहिलेले युवकही पोलिस ठाण्यात हजर झाले. पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी पोलिसांचे पथक तयार करुन संशयीत आरोपीच्या मागावर पाठविले. पो. काॅ. संदीप राजपूत व पोलीस वाहन चालक समीर पाटील यांनी सापळा रचून ६७ वर्षीय संशयीत आरोपीस अटक केली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.