धक्कादायक : लाडकी बहिण योजनेत एकाच महिलेचे तब्बल ३० अर्ज, खात्यात जमाही झाले पैसे
राज्य सरकारला लावला चुना
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l मुख्यमंत्री लाडकी योजनेत एकाच व्यक्तीने सरकारला मोठा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला. एकाच महिलेच्या नावावर वेगवेगळे फोटो लाऊन तब्बल ३० अर्ज दाखल केले . त्या पैकी २६ अर्जांचे योजनेचे पैसे खात्यात जमा झाले. परंतु हा प्रकार उघडकीस आल्याने लाडक्या बहिणीने सरकारला चुना लावून फसवणूक केल्याचं बाहेर
आलं.
राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण ही योजना सुरू केली. या योजनेत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातील. अर्ज करणाऱ्या लाखो लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे १५०० रुपये प्रमाणे प्रत्येकी तीन हजार रुपये खात्यात जमाही झाले. परंतु अर्ज करणाऱ्या लाखो बहिणींना अजूनही या पैकी एक रुपया सुद्धा मिळालेला नाही. मात्र
साताऱ्यातील जाधव नामक एका व्यक्तीनं वेगवेगळ्या आधार कार्डचा वापर करुन एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर करत पत्नीच्या नावे ३० अर्ज दाखल केले. त्या पैकी २६ अर्ज मंजूर होऊन चार अर्ज ना मंजूर झाले.
खारघर येथील रहिवासी असलेल्या पूजा महामुनी यांनी अर्ज दाखल करून मोबाईल नंबर लॉगिंग करण्याचा प्रयत्न केला मात्र तो होत नव्हता. खारघर येथील महामुनी यांचा अर्ज वारंवार भरून देखील सबमिट होत नव्हता. मात्र लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल आणि मंजूर करण्यात आल्याची माहिती दाखवण्यात आली, सदर व्यक्तीनं ३० अर्ज दाखल केले असून त्या पैकी २७ लाभार्थ्यांचं नाव एक सारखं होतं मात्र आधार कार्ड नंबर वेगवेगळे होते. यामुळं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला
प्रकरणातील संबंधित व्यक्तीनं एकाच पत्नीचा फोटो वेगवेगळ्या पोशाखात काढून २७ महिला असल्याचं दाखवलं असल्याचं देखील उघड झालं आहे, या प्रकरणी पनवेल तहसिलदार कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून संबधीत व्यक्तीने पासवर्ड देखील बदलला असल्याचं समोर आलं आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा