धक्कादायक : स्वतःच्या मुलीवर जन्मदात्या बापाचा लैंगिक अत्याचार
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा पुण्यातून आणखी एक अत्याचाराची घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापाने स्वतःच्या १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
पुण्यातील नांदेड सिटी परिसरात बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. नराधम बाप मुलीची आई घराबाहेर गेल्यावर सतत ८ महिने स्वतःच्या १४ वर्षे मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता. बाल हक्क समितीने हा प्रकार उघडकीस आणला. पुण्यातील नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम बापाला अटक करण्यात आली आहे.
.