भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमधुळे

धक्कादायक : मैत्रिणीला भेटायला गेलेल्या प्रियकराची निर्घृण हत्या, आरोपीच्या घरासमोरच जळाला नातेवाईकांनी मृतदेह

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी चार युवक गेले असता गावकऱ्यांनी त्या चौघा युवकांना संपूर्ण रात्रभर एका घरात डांबून ठेवले व त्यांना जबर मारहाण केल्याने मारहाणीत त्यातील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. सदर युवक मृत झाल्याचे मारेकऱ्यांच्या लक्षात आल्या नंतर घटनास्थळावरून मृत युवकाला एका नाल्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली. ही धक्कादायक घटना धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील काळापाणी गावांत घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून या घटनेनंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी मृतदेह काळापाणी गावात नेऊन मारहाण करणाऱ्या आरोपींच्या घरासमोरच नेऊन त्याच्यावर अंत्यविधी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील उमर्दा गावातील २० वर्षीय युवक कमलसिंग पावरा हा आपल्या मित्रांसोबत काळापाणी गावात आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला असता गावातील त्या मुलीच्या नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी या चारही तरुणांना एका घरात डांबून ठेवले. त्यानंतर, या चौघांना रात्रभर बेदम मारहाण करण्यात आली. ती मारहाणीत कमलसिंग पावरा वय २९ वर्ष हा तरुण जागीच मरण पावला.

त्यानंतर मारहाण करणाऱ्या आरोपींनी उमर्दा गावातील ग्रामस्थांना यासंदर्भात माहिती दिली. की तुमच्या मुलांना येथून सुखरूप घेऊन जायचं असेल तर प्रत्येकी पाच हजार रुपये आम्हाला द्या. अशी मागणी काळापाणी  गावातील लोकांनी केली असता गावातील काही लोकांनी मध्यस्थी करत त्या पैकी तीन तरुणांची सुटका करून घेतली. मात्र कमलसिंग पावरा याच्यासंदर्भात विचारले असता तो रात्रीच येथून पळून गेल्याचे काळपाणी येथील गावकऱ्यांनी सांगितले.

या घटनेनंतर कमलसिंग पावराचा याचा उमर्दा गावातील नागरिकांनी व नातेवाईकांनी शोध घेतला असता, कमलसिंग पावरा हा तरुण उमर्दा व काळापाणी या दोन्ही गावच्या मध्ये असलेल्या एका नाल्यामध्ये मृत अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची पाहणी केली असता कमलसिंग पावरा याला बेदम मारहाण करण्यात आली असून त्यात त्याचा मृत्यू झाला व त्या नंतर त्याला या नाल्यात फेकून दिलाचा आरोप मृत कमलसिंग पावरा यांच्या नातेवाईकानी केला आहे.

या घटने ची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोनि जयपाल हिरे पथकासह घटनास्थळी दाखल होत कमल सिंग पावरा याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्या साठी शिरपूर येथे पाठवला.

कमल सिंग पावरा याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर उमर्दा गावातील कमल सिंग पावरा याच्या संतप्त नातेवाईकांनी कमल सिंग पावराचा मृतदेह थेट काळापाणी गावात नेऊन त्याला मारहाण करणाऱ्या संशयित आरोपींच्या घरासमोरच त्याच्या पार्थिवावर अंत्यविधी केला. यावेळी, संतप्त नातेवाईकांनी संशयित आरोपींच्या घराची तोडफोड करत नुकसान देखील केले आहे.या प्रकरणी अखेर सांगवी पोलीस स्टेशनला ७ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या पैकी एका आरोपीला ताब्यात घेतले असून फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!