धक्कादायक : बालविवाहित तरुणीने अत्याचारातून दिला बाळाला जन्म
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न केल्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात येऊन तिने बाळाला जन्म दिल्याची घटना अमळनेर तालुक्यातील ढेकूतांडा येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील एका १७ वर्षीय मुलीचे १ एप्रिल २०२४ रोजी अमळनेर तालुक्यातील ढेकू तांडा येथील २७ वर्षीय तरुणाशी लग्न झाले. आधीच अल्पवयीन असताना तिचे लग्न केले. त्यात पीडित मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आले. या अत्याचारातून तिने एका गोडस मुलीला जन्म दिला.
या संदर्भात पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, रविवार २३ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता तिच्या पती सह सासू-सासऱ्यां विरोधात अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. या घटने संदर्भात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बारेकर हे करीत आहेत.