भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

धक्कादायक! बुंदीचे लाडू, पेढे खाल्ल्याने कुत्र्यांनाही डायबिटीसची लागण, केसही गळाले

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | डायबिटीस (मधुमेह) हा एक जुनाट आजार आहे जो कुत्रे, मांजरी आणि इतर प्राण्यांना (वानर, डुक्कर आणि घोडे यांसह) तसेच मानवांनाही प्रभावित करू शकतो. अशीच शिर्डीमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिर्डीतील कुत्र्यांना डायबिटीस झाल्याचं निष्पन्न झालंय़..

भक्तांकडून श्रद्धेपोटी मिळणारे बुंदीचे लाडू, पेढे, बिस्किटे आणि दुधाचा अतिरेकी आहार भाविकांकडून मिळत असल्याने शिर्डीतील कुत्र्यांना डायबिटीस झाल्याचं निष्पन्न झालंय़.. शहरातील अनेक कुत्र्यांचे केस गळाले असून, /पोटात जंतू झाल्याने ते आजारी पडत आहेत. सतत गोड पदार्थ सेवनाने श्वानांमध्ये लट्टपणाही दिसून येतोय… साईबाबांवरील श्रद्धेपोटी साईभक्त मंदिर परिसरातील कुत्र्यांना प्रसाद म्हणून गोड पदार्थ भरवतात. सतत मिळणारे भरपेट गोडधोड खाण्याने मंदिराच्या दीड किलोमीटर परिघातील कुत्रे धष्टपुष्ट झाले आहेत. त्यांचे वजन वाढल्याने लठ्ठपणा अंqगी आला आहे. हे कुत्रे कायम एका ठिकाणी पडल्याचे चित्र आहे. तर मंदिरापासून दोन किलोमीटर परिघाबाहेरील कुत्रे मात्र तरतरीत असल्याचा विरोधाभास शिर्डीत दिसून येतोय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!