धक्कादायक : लॉजवर बनावट नोटा छापण्याचा कारखाना, २० हजार ७०० रुपये जप्त
नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका लॉजवर बनावट नोटा छापण्याचा कारखाना आढळून आला आहे. आरोपींकडून २० हजार ७०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. यापूर्वी सुद्धा राज्यात अनेक ठिकाणी बनावट नोटा छापण्याचे प्रकार उघड झाले
नाशिक जिल्ह्यातीत दिंडोरीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिंडोरीतील लॉजवर हा छापखाना सुरू होता. या ठिकाणाहून प्रिंटर, कागद आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. २० हजार ७०० रुपयांच्या मुद्देमालासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी बनावट नोटा पकडल्या जात आहे मात्र कुठलीही ठोस कारवाई करण्यात येत नाही. गुन्हेगारांना पाठीशी घातले जात असल्याचे बोलले जाते.